Cabinet Expansion | अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या नऊ आमदारांचा शपथविधी झाला. मात्र अद्यापही या मंत्र्यांना खाते देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खात्य वाटप कधी होणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबद्दल अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठा खुलासा केला आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना सुनील तटकरे म्हणाले, “सत्तेत सामील झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाही. हा काही तिढा वगैरे नाही. त्याचबरोबर रायगडच्या मंत्री पदाबाबत (Cabinet Expansion) आम्ही कोणत्याही प्रकारचा आग्रह धरलेला नाही. आम्ही एकत्रितपणे काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही काम करणार आहोत.
Chief Minister Eknath Shinde will take appropriate decision at his level
पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्या (13 जुलै) संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खाते वाटपाबाबत निर्णय झाल्याचं तुम्हा सर्वांना कळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घेतील. त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत.”
मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खाते वाटेपाबाबत उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, “काही तासानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होणार आहे. परंतु, या सर्वांसाठी किती तास लागेल हे मी सांगू शकत नाही. मात्र सर्वांना विश्वासात घेऊनच लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप करण्यात येईल.”