Satyashodhak Movie | आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत, समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule ) यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ ( Satyashodhak Movie ) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर या चित्रपटातील सावित्रीमाईंच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे ( Rajshri Deshpande ) यांचे पोस्टर म्हणजेच फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे म. फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावित्रीमाईंच्या या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
पुण्यातील फुले वाड्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. ‘‘युगानु युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत, सावित्रीमाईची गोष्ट!!’’ सांगणाऱ्या सावित्रीमाईंच्या समोर कंदिलाच्या प्रकाशात पाटी पेन्सिल आहे आणि त्यावर अक्षरे टिपलेली आहेत.
‘सत्यशोधक’ ( Satyashodhak Movie ) चित्रपटामध्ये राजश्री देशपांडे साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका
शांत, प्रेमळ आणि समजूतदारपणाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी बोलक्या दिसत आहेत जणू स्त्रियांच्या प्रगत, शिक्षीत आणि नवजीवनाची दिशा आखत आहेत! आडवं कुंकू हे सावित्रीमाईंची ओळख सांगतं. राजश्री देशपांडे ( Rajshri Deshpande ) यांच्या या पर्फेक्ट लूकमुळे सावित्रीमाई ( Savitribai Phule ) याचि देही, याचि डोळा आपल्याला समोर दिसतात.
अभिनयासाठी फिल्मफेअर ओटीटीचा उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ( Satyashodhak Movie )
यापूर्वी म. ज्योतिराव फुले ( Mahatma Jyotiba Phule ) यांचे पोस्टर लॉन्च झाले होते, अभिनेते संदिप कुलकर्णी म. फुलेंची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या लूकचीही जोरदार चर्चा झाली होती. तर, अभिनेत्री राजश्री देशपांडे ( Rajshri Deshpande ) यांना यापूर्वी उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर ओटीटीचा उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.
निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ ( Satyashodhak Movie ) हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.
NAAL : अशी सापडली ‘नाळ भाग २’मधील चिमी !