Ajit Pawar Group | छत्रपती संभाजीनगर । गेल्या काही दिवसापासून राजकीय गुंडांकडून सामान्य जनतेला मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. आपले कोणीच काही करू शकत नाही, या भावनेने हे लोक सर्रास सामान्य जनतेला त्रास देणे सुरु केले आहे.
असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षासह छावा, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याकडून कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे, तसेच तुझ्या कुटूंबाला जिवंत मारून टाकतो अशी धमकी या राजकीय गुंडानी दिली आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सचिन मिसाळ, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रमेश गायकवाड, गजानन पवार यांनी जीवंत मारण्याचा कट केला असल्याचा आरोप तक्रादार वाघ यांनी केला आहे.
हे तेच गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, जे विनोद पाटलांना छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गरीब मराठयांना मारहाण केली होती. पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून या राजकीय गुंडानी मराठा मंदीर येथे गरीब मराठयांना मारहाण केली होती. यांची गुंड प्रवृत्ती वाढत चालली असून आठवड्यातील या गुंड्याची ही दुसरी मारहाण आहे.
अजित पवार गटाचे सचिन मिसाळ याने मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून १० लाख रुपये घेऊन मराठा मंदीर येथील मराठा समाजची सभा उधळून टाकण्याची सुपारी घेतल्याचा आरोप अंतरवाली सराटी येथील मराठा कार्यकर्त्यांनी यापूर्वी केला आहे.
राजकीय दबावाला बळी पडून छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस यंत्रणा या गुंडाविरोधात कुठलीही कारवाई करताना दिसत नसल्याचे समोर येत आहे. सामान्य नागरिकांना त्रास होताना पोलीस फक्त बघण्याची भूमिका घेत आहेत.
प्रकरण नेमके काय ?
प्रवीण वाघ नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत ( एंजेल किड्स इंटरनॅशनल स्कूल ) कर्तव्य बजावत होते. तिथे काही राजकीय गुंड प्रवृत्तीचे लोक शाळेच्या आवारात येऊन लहान मुलांसमोर शिवीगाळ करत होते. प्रवीण वाघ यांनी त्यांना नम्रपूर्वक काही अडचण असेल तर शाळेच्या ऑफिस मध्ये या आपण बसून बोलूया असे सांगितले. पण या गुंड्यानी प्रवीण वाघ यांना दगडाने मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच वाघ यांच्या कुटुंबियांना जिवंत मारून टाकू अशी धमकी या राजकीय गुंडानी दिली आहे.
सचिन मिसाळ, अशोक मोरे, रमेश गायकवाड आणि गजानन पवार यांच्या विरोधात सातारा पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच राज्यातील महत्वाच्या व्यक्तींना तक्रारीची प्रत पाठवण्यात आली आहे.
१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य.
२) देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.
३) अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
४) अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते, महाराष्ट्र राज्य.
५) विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधीपक्ष नेते, महाराष्ट्र राज्य.
६) पुरुषोत्तम खेडेकर, अध्यक्ष, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र राज्य.
७) पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य.
८) पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.
तक्रार डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लीक करा