मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर त्याठिकाणी कंटेनर शाखा उभारली आहे. या नंतर उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तिथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटाच मोठा तणाव निर्माण झाला.
“अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजुला ठेवा आणि समोर या… दिल्लीच्या कृपेनं आज तुम्ही सत्तेत बसला आहात. कठपुतली आणि बाहुल्यांनो.. तुमच्यात हिंमत नाही. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजुला ठेवा आणि आम्हाला भिडा. आमची तयारी आहे.”
तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने मी तिकडे जाऊन उभा राहिलो. बघू कुणाच्यात किती हिंमत आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी यांचे (शिंदे गट) सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवा – उद्धव ठाकरे
सरकारला सत्तेचा माज आला आहे. त्यांचा हा माज निवडणुकीत उतरवू. सत्तेचा माज आलेल्यांवर बुलडोझर फिरवणार आहोत. खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं. पण तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, मग दाखवतो या असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं.