छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) क्रीडा युवक संचलनालय पुणे, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावलं
ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडली असून एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद भूषवलं.या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता यातील पहिला सामना वाय एस खेडकर स्कूल विरुद्ध एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल यांच्यामध्ये झाला होता
या सामन्यात एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलने 23 धावांनी विजय प्राप्त केला तर आदित्य राठोड याने उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतरचा सामना रयान इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल यांच्यात झाला या सामन्यांमध्ये स्कूलने 13 धावांनी विजय प्राप्त केला.
यामध्ये देखील आदित्य राठोड याने 23 धावांची उत्कृष्ट कामगिरी केली.यानंतरचा सामना नाथ व्हॅली स्कूल विरुद्ध एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल असा झाला असून अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात स्कूलने दोन धावांनी विजय मिळवला यामध्ये अष्टपैलू खेळाडू वेद शर्मा याने 28 धावा आणि दोन गडी बाद करून उत्कृष्ट खेळी केली .
गुरुकुल ओलंपियाड स्कूल विरुद्ध एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल या सामन्यांमध्ये शाळेने 14 धावांनी विजय प्राप्त केला. यामध्ये देखील वेद शर्मा याने 25 धावा करत उत्कृष्ट कामगिरी केली. एस बी स्कूल विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये 21 धावा करत शाळेने विजय प्राप्त केला यामध्ये वेद शर्मा याने 30 धावा केल्या त्याच्यासोबत आदित्य राठोड याने भागीदारी केली.
तर गोलंदाज अभिनव जाधव याने २ गडी बाद केले यास्पर्धेचा अंतिम सामना पोद्दार सीबीएससी स्कूल आणि एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल यांच्यामध्ये झाला.यामध्ये देखील पोद्दार स्कूलला सहजरित्या मात देत शाळेने एकतर्फी सामना जिंकला असून 51 धावांनी पोद्दार शाळेचा दारुण पराभव केला.
या सामन्यामध्ये फलंदाज वेद शर्माने ३३ धावा, आदित्य राठोडने 17 धावा आणि अंशुमन वाकडेने 10 धावा करत उत्कृष्ट फलंदाजी केली आणि सहा षटकांमध्ये 78 धावांचे आव्हान दिले होते तसेच गोलंदाज अभिनव जाधव याने दोन षटकात चार धावा देत सहा गडी बाद केले यात अभिनवने चांगली कामगिरी करत तो उत्कृष्ट सामनावीर ठरला आणि संघास देखील विजेतेपद प्राप्त करून दिले.
पोद्दार संघाला 27 धावांमध्ये रोखले आणि एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकावलं .. या स्पर्धेत वेद शर्मा,आदित्य राठोड, अंशुमन वाकडे, हूजेफा पटेल, योगराज कुमावत ,मानव थोरात, ओम फुंदे ,साद शेख ,शौर्य वांगेकर, स्वराज जाधव, श्रेयस जगदाळे, प्रतीक वाघमारे, स्मित शर्मा, निखील जांगिड , तनिष्क जांगिड या सर्व खेळाडूंचा सहभाग होता.
यासर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रवीण वाघ आणि शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेचे संचालक तुकाराम मुंढे ,मुख्याध्यापिका आशा मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई , मनपा क्रीडा अधिकारी संजय बालय्या , क्रीडा अधिकारी सचिन पुरी ,लता लोंढे,अकॅडमीक हेड जसविंदर कौर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं.