मला भारतीय आणि शीख असल्याचा अभिमान; पाकचे बकवास खेळाडू नशा करून बोलतात – हरभजन सिंग

'Kon sa nasha...': Harbhajan Singh fumes over Inzamam-ul-Haq's 'conversion' claim
Harbhajan said, "Yeh kon sa nasha pee kar baat kar raha hai? I am a proud Indian and proud Sikh..yeh Bakwaas log kuch bi bakte hai."

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती, ज्यात अनुभवी फिरकीपटू शिख धर्मातून इस्लामकडे जाण्याचा विचार करत असल्याचा एक जुना व्हिडिओ X वर व्हायरल झाला होता.

हरभजन प्रतिक्रिया देत म्हणाला, “ये कौन सा नशा पी कर ( इंझमाम-उल-हक ) बात कर रहा है? मला गर्व आहे भारतीय आणि शीख असल्याचा. ये बकवास लोग (पाकिस्तानी )  कुछ भी बकते है.”

पाकिस्तान क्रिकेट संघासोबत नमाज पठण करणार्‍या मौलाना तारिक जमीलच्या शिकवणीने हरभजन सिंग कसा प्रेरित झाला, असा दावा करणारा इंझमामचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

“आम्ही एक खोली नमाज पठणसाठी ठेवली होती जिथे आम्ही आमची नमाज अदा केली. नमाजानंतर मौलाना तारिक जमील काही वेळ आमच्याशी बोलायचे. त्यादरम्यान आम्ही इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांना बाकीच्यांसोबत नमाज पढण्यासाठी आमंत्रित केले.

काही इतर खेळाडूही आमच्यात सामील व्हायचे. त्यांनी नमाज अदा केली नाही, परंतु मौलाना तारिक जमीत काय म्हणायचे ते बसून ऐकायचे.

इंझमाम-उल-हकने पुढे दावा केला की, “एक दिवस हरभजन सिंगने सांगितले की, माझे मन मला मौलानाचे शब्द ऐकण्यास सांगत आहे. त्याला माहित नव्हते की ही व्यक्ती कोण आहे, पण तो म्हणाला, “दिल करता है इसकी बात मान लू.” मग मी म्हणालो, “त्याचे ऐक, काय नुकसान आहे.” तो म्हणाला, “तुम्हे देखके रुक जाता हु. (तुला पाहून मी थांबतो)” मी उत्तर दिले, “मुझे देखके क्यू रुक जाते हो? (मला बघून का थांबतोस).

त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ता, इंझमाम-उल-हक याने ठामपणे सांगितले की, त्याने त्याचा सहकारी सकलेन मुश्ताकसह परदेशी आणि इंग्लिश खेळाडूंना इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. क्लबसाठी खेळत आहे.

नामदेव जाधव तोतयेगिरी करणारा; जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी संबंध नाही – रोहित पवार

व्हिडिओ लिंक – 

https://x.com/harbhajan_singh/status/1724468086907240557?s=20

https://x.com/YearOfTheKraken/status/1724356528155820344?s=20