नामदेव जाधव तोतयेगिरी करणारा; जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी संबंध नाही – रोहित पवार

namdev jadhav and rohit pawar
नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे

मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर आरोप करणारे नामदेव जाधव राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी शरद पवार यांच्यावर टीका करत आहे, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.

रोहित पवारांनी फेसबुक पोस्त करत लिहिले  “नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत आहे.

याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. याबाबतचं पत्र त्यांनी दिलं.. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे. लोकांच्या माहितीसाठी हे पत्र मी शेअर करत आहे.”

दरम्यान, नामदेव जाधव हा तोतया असून राजमाता जिजाऊंचा वंशज नाही त्या बद्दल लोणीकंद पोलिसांकडे विकास लवांडे यांनी फिर्याद दिली आहे. शरद पवार साहेबांची बदनामी करून मराठा तरुणांची माथी भडकवण्याचा भाजपा अशा तोतया लोकांकडून प्रयत्न करत आहे.असल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे.

यावर नामदेव जाधव काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

“अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजुला ठेवा आणि समोर या… – उद्धव ठाकरे