सत्ता टिकवण्यात गुंग असणाऱ्या शिंदे-फडणवीस-पवारांमुळे राज्याला बसला पाच हजार कोटींचा भुर्दंड

सत्ता टिकवण्यात गुंग असणाऱ्या शिंदे-फडणवीस-पवारांमुळे राज्याला पाच हजार कोटींचा भुर्दंड बसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे .
राज्य सरकारच्या ह्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राज्याला चार ते पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. केंद्राकडून येणारी मदत आता राज्याला मिळणार नाही.

सत्ता टिकवण्यात गुंग असणाऱ्या शिंदे-फडणवीस-पवारांमुळे राज्याला पाच हजार कोटींचा भुर्दंड बसल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे .

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या ह्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राज्याला चार ते पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. केंद्राकडून येणारी मदत आता राज्याला मिळणार नाही. असे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणले आहे.

कर्नाटक मधील काँग्रेस सरकारला जे करता आले ते महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना का करता आले नाही?

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून निधी आणण्यात राज्य सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे.

सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या ह्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे राज्याला चार ते पाच हजार कोटींचा भुर्दंड बसणार आहे. केंद्राकडून येणारी मदत आता राज्याला मिळणार नाही.

एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे निधी मिळणे अवघड आहे. शेजारच्या कर्नाटक राज्याने दुष्काळ निवारणाचे सर्व काटेकोर नियोजन करून केंद्र सरकाला निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. जर कर्नाटकला हे जमत असेल तर महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.